Latest
सोलापूरच्या बार्शी शहरात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पूनम निरफळ हिचा अनैतिक संबंधातून केतन जैन या आरोपीने धारदार शस्त्राने खून केला. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला असून तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
05-11-2025महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असून सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
05-11-2025अमेरिकेतील लुईसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर UPS कंपनीचे MD-11 मालवाहू विमान कोसळले. अपघातात ३ ठार, ११ जखमी झाल्याची पुष्टी झाली असून परिसरात भीषण आग लागली आहे.
05-11-2025छत्तीसगडमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर होऊन ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
04-11-2025महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळ्यातील मुख्य आरोपी रवी उप्पल दुबईतून बेपत्ता झाला आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसनंतर अटक करण्यात आलेल्या उप्पलचे प्रत्यार्पण प्रलंबित असतानाच तो गायब झाला आहे. भारतीय आणि यूएई अधिकाऱ्यांकडे त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही.
04-11-2025पुण्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या २० दिवसांत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं आहे. दरम्यान, अभिनेता हेमंत ढोमेने एक्सवरून पोस्ट करत या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
04-11-2025
