फलटणमधील डॉ. तरुणी प्रकरण गंभीर; “ट्रँगल लोकांसमोर आणण्यासारखं नाही” – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर : फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात आता नवे वळण आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, “मयत आणि दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधील माहिती पाहता परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणातील ‘ट्रँगल’ लोकांसमोर आणण्यासारखा नाही.” गोरे यांनी स्पष्ट केले की, पोलिसांना वास्तव मांडण्याची परवानगी दिल्यास जे काही सत्य बाहेर येईल, ते समाजाला स्वीकारावे लागेल. त्यांनी मृत डॉ. तरुणीबद्दल आदर व्यक्त करत म्हटलं – आपल्या संस्कृतीत मयत भगिनीबद्दल अनादर करण्याची पद्धत नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकीय पोळी भाजू नये. पारदर्शक तपास होऊन तिला न्याय मिळावा.”

 “रामराजेंनी राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधू नये” – गोरे

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. राजकीय अस्तित्व गमाविलेली काही माणसे या प्रकरणाच्या आडून राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधत आहेत. जनता भोळी नाही. ४० वर्षे तुम्हाला पाहिलंय, आता उगाच भांडवल करू नका,”
असा टोला त्यांनी लगावला.