उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन मन सुन्न करणारी घटना; महाराष्ट्रावर शोक कळा
बारामती: राज्याची
उपमुख्यमंत्री तथा विकासात्मक राजकारणातील दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अजितदादा
पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त आहे. अजितदादांच्या अपघाती
निरणाचे वृत्त समजतात मराठी मन सुन्न झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत
अजित दादा प्रचार सभेसाठी मुंबईवरून खास विमानाने बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळावर
विमान लँड होण्यापूर्वीच अपघात झाल्याने विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. या
घटनेमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
विमान कोसळल्यानंतर आगीचे प्रचंड लोण निर्माण झाले. यामध्ये अजितदादा यांच्यासह
त्यांचे स्वीय सहाय्यक व विमानातील कृ मेंबरचा मृत्यू झाल्याचे अधिकृत पणे जाहीर करण्यात
आले. घटनेची माहिती मिळताच अग्नी शामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वीच
सारे काही होत्याचे नव्हते झाले होते. अजित दादांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचलेल्या
कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच हंबरडा फोडला.