महिला बचत गटाच्या पंखात उमेदचे बळ

सोलापूरजिल्ह्यातील विविध बचत गटांच्या उत्पादनांना सोलापुरातील बाजारपेठ उपलब्ध करून देत उमेदने महिला उद्योजकांच्या पंखात बळ दिले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित रुक्मिणी महोत्सवात विविध घरगुती पदार्थांची आणि तयार खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. रंगभवन चौका जवळील वोरोनोको प्राथमिक शाळेच्या मैदानात सोमवार २० जानेवारी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

      ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पाच दिवसीय रुक्मिणी महोत्सव हा  उपक्रम राबवला आहे.  राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धाचेही  आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात भाजीपाल्यापासून तयार खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. रानभाज्या,फळ, कापडी वस्तू आणि लोकरीच्या घोंगडे पर्यंत वस्तू विक्रीसाठी उपलब्द आहेत. या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या ग्रामीण भागातील माता भगिनींना आर्थिक बळ देण्याचे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी केले आहे.

------

40 लाखांची उलाढाल अपेक्षित - ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि शहरी ग्राहकांना दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून देणे आशा दुहेरी उद्दिष्टांसाठी रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय महोत्सवात एकूण 75 स्टॉल द्वारे महिला बचत गट सहभागी झाले आहेत. यामध्ये विविध वस्तू सह खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. घरगुती मसाले पासून हातमागावरील मोबाईल कव्हर सह वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवा सोलापूरकरांकडून मिळणारा प्रतिसाद अभिनंदनिय असून या पाच दिवसात एकूण सुमारे 40 लाखांची उलाढाल अपेक्षित आहे. 

- सचिन चवरे, उमेद -जिल्हा अभियान व्यवस्थापक

---------

बचत गट धारकांना उत्कृष्ट व्यवस्था - रुक्मिणी महोत्सवात ग्राहकांकडून मिळत असलेल्या प्रतिसाद अतिशय चांगला आहे गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर संपूर्ण कुटुंबीयांसह या महोत्सवाला भेट देत आहेत आमच्या बचत गटाच्या मसाले व खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे .त्यामध्ये विविध प्रकारचे कुरवड्या, पापड, मसाले, ज्वारी-बाजरीच्या भाकरी, शेंगा पोळी, आवळा कॅन्डी आणि हुरड्याला पसंती मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रुक्मिणी महोत्सवात सहभागी होत आहोत. येथे बचत गट धारकांसाठी अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.

- संगीता देवरमनी, गौरी बचत गट,  नागणसूर