माजी आमदार नरसय्या अडम यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका

संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. 21-येथील माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. एका हॉटेल येथे एका कार्यक्रमासाठी आडम मास्तर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले की पालकमंत्री एका सिनेमा हॉलच्या उदघाटनासाठी पहिल्यांदा सोलापुरात येत आहेत त्याबद्दल आपले मत काय? त्यावर आडम म्हणाले की, ही अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे. सिनेमा हॉलचे उदघाटन करण्याचे काम सिनेनटीचे आहे. पालकमंत्र्यांना मी सांगणार आहे की तुम्ही सिनेनट नाही पालकमंत्री आहात. तुम्ही शेतकरी, श्रमिकांची कामे करा, त्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा तुमच्या विरोधात मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत अनिल वासम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.