सीबीआयची मोठी कारवाई! अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्यावर ₹२२८ कोटी फसवणुकीसाठी गुन्हा दाखल
केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) मोठी कारवाई करत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध
गंभीर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या ₹२२८.०६ कोटींच्या कथित फसवणुकीसंदर्भात दाखल करण्यात आला आहे. बँकेनं
केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पीटीआयनं दिली. कर्ज
आणि थकबाकीचा तपशील तक्रारीनुसार, जय अनमोल अंबानी यांनी
त्यांच्या समूहाशी संबंधित रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) मार्फत बँकेकडून कर्ज घेतलं होतं.
- मुंबईतील बँकेच्या
एससीएफ शाखेकडून ₹४५०
कोटींची क्रेडिट सुविधा कंपनीला देण्यात आली होती.
- कर्ज देताना आर्थिक
शिस्त, वेळेवर
हप्ते आणि सर्व विक्री उत्पन्न बँक खात्यात जमा करण्याच्या अटी घालण्यात
आल्या होत्या.
मात्र कंपनी हप्ते वेळेवर भरू शकली नाही, आणि ३० सप्टेंबर २०१९ रोजी खाते एनपीए घोषित करण्यात आलं.
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये धक्कादायक निष्कर्ष
बँकेच्या तक्रारीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ दरम्यानचा
फॉरेन्सिक ऑडिट ग्रँट थॉर्नटन यांनी केला.
तपासात पुढील बाबी उघड झाल्या—
- कर्जाचा निधी मूळ
उद्देशासाठी न वापरता इतरत्र वळवण्यात आला
- खात्यांमध्ये फेरफार
आणि आर्थिक अनियमितता करण्यात आल्या
- आर्थिक स्रोतांचा गैरवापर
करण्यात आला
फसवणुकीचे गंभीर आरोप
बँकेचा आरोप आहे की,
- कंपनीचे माजी
प्रवर्तक आणि संचालक यांनी मिळून निधीचा गैरवापर आणि वळवणूक केली
- बँकेच्या आर्थिक
बाबींचा गैरफायदा घेतला
- यामुळे बँकेचं तब्बल
₹२२८
कोटींचं नुकसान झालं
याच्या आधारे सीबीआयनं जय अनमोल अंबानी, RHFL आणि संचालक रवींद्र शरद सुधाकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून
प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.