भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने; उद्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर विजेतेपदाची लढत
नवी मुंबई | ICC Women’s World Cup 2025 Final:
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या थरारक अंतिम सामन्यात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या (रविवार, २६
ऑक्टोबर) सामना रंगणार आहे. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये विश्वविजेता
ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. दुसरीकडे, दक्षिण
आफ्रिकेने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
सामना
कुठे आणि कधी?
हा रोमांचकारी सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील
स्टेडियमवर दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघ विजेतेपदासाठी सज्ज झाले
असून क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत.
दोन्ही
संघांची आतापर्यंतची कामगिरी:
भारतीय आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यापूर्वी कधीही
वर्ल्डकप फायनलमध्ये एकमेकांसमोर आलेले नाहीत.
आजवर एकूण ३४ एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये झाले असून, त्यात भारताने २० वेळा विजय मिळवला, तर दक्षिण
आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. या आकडेवारीनुसार
भारताचे पारडे जड असले तरी सध्याच्या फॉर्मनुसार दक्षिण आफ्रिका संघ अधिक प्रभावी
दिसत आहे.
स्पर्धेतील प्रदर्शन:
या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने ७ पैकी ५ सामने जिंकले
आणि दोन हरले आहेत.
तर भारतीय संघाने ३ सामने जिंकले, ३ गमावले
आणि एक सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघांनी साखळी सामन्यात ज्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव
पत्करला होता, त्यांनाच सेमीफायनलमध्ये हरवून फायनलमध्ये
प्रवेश केला आहे.
ऐतिहासिक
पार्श्वभूमी: १९९७ पासून आतापर्यंत झालेल्या महिला विश्वचषकात भारत आणि
दक्षिण आफ्रिकेने एकमेकांना तीन-तीन वेळा हरवले आहे. त्यामुळे रविवारीचा हा सामना
दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा आणि संतुलित लढत ठरणार आहे.
भारतीय संघाचा आत्मविश्वास जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत
कौर आणि दीप्ती शर्माच्या शानदार फॉर्ममुळे वाढला आहे, तर
दक्षिण आफ्रिकेकडून नदिन डी क्लार्क, लॉरा वॉल्वार्ड आणि
शबनीम इस्माईल यांच्याकडून उत्कृष्ट खेळीची अपेक्षा आहे.