सोलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी: आजपासून सोलापूर–इन्दौर विमानसेवेची सुरुवात
सोलापूर–मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
मिळत असतानाच सोलापूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज, १९ जानेवारीपासून सोलापूर–इन्दौर विमानसेवेची अधिकृत सुरुवात झाली आहे.
स्टार एअर या विमान कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे सोलापूर आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या शहराशी हवाई मार्गाने
जोडला गेला आहे.
वेळापत्रक काय आहे?
विद्यमान सोलापूर–मुंबई विमानसेवा आता इंदूरपर्यंत
वाढवण्यात आली आहे.
- सोलापूरहून विमान
दुपारी २.५० वाजता उड्डाण करेल
- ३.५५ वाजता मुंबई
विमानतळावर पोहोचेल
- मुंबईत सुमारे ४५
मिनिटांचा थांबा
- सायंकाळी ४.३५ वाजता
इंदूरकडे रवाना
- सायंकाळी ५.५० वाजता
इंदूर विमानतळावर आगमन
आठवड्यातून तीन दिवस सेवा
ही विमानसेवा सोमवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवस चालवली जाणार आहे. या सेवेसाठी तिकीट दर प्रति प्रवासी सुमारे ४,१०० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. व्यापार आणि प्रवाशांना मोठा फायदा या नव्या विमानसेवेचा सोलापूर व परिसरातील व्यापारी, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. सोलापूर–मुंबई मार्गावरील वाढता प्रवासी प्रतिसाद पाहता, ही सेवा इंदूरपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेतल्याचे स्टार एअरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोलापूरची हवाई जोडणी वाढत असल्याने शहराच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नक्कीच चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.