हरियाणा सरकारकडून मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेत वाढ; मदत रक्कम ५१ हजार रुपये

चंदीगड : भारतीय समाजात मुलींच्या लग्नावर होणारा खर्च अनेकदा
कुटुंबांना आर्थिक संकटात आणतो. विशेषतः गरीब आणि मागासवर्गीय घटकांना मोठा ताण
सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
आहे. संचार
मुख्यमंत्री विवाह शगुन
योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात १०,००० रुपयांची वाढ
करण्यात आली आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना ५१,००० रुपयांची
आर्थिक मदत कन्यादान स्वरूपात मिळणार आहे. पूर्वी ही रक्कम ४१,००० रुपये होती. सरकारच्या नव्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यामुळे ही योजना
तात्काळ लागू होणार आहे. ही मदत फक्त त्या कुटुंबांना दिली जाईल, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपर्यंत आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल आणि बेटी बचाओ-बेटी पढाओ
योजनेस बळकटी मिळेल. सरकारने स्पष्ट केले आहे की, विवाह
नोंदणी लग्नाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत करणे बंधनकारक राहील. या अटीमुळे
पारदर्शकता वाढेल आणि बालविवाहासारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींना आळा बसेल. संचार