ट्रम्प हॉटेल रेंटल’च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; कर्नाटकमधील ८०० गुंतवणूकदार ठरले बळी

बंगळूर : अमेरिकेचे माजी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या AI-जनरेटेड व्हिडिओ
आणि फोटोंचा वापर करून कर्नाटकात मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. ‘ट्रम्प हॉटेल
रेंटल’ नावाचे एक बनावट मोबाइल ॲप तयार करून २०० हून अधिक
गुंतवणूकदारांची पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून २ कोटी रुपयांहून अधिक रक्कम
फसवण्यात आली आहे.
फसवणूक कशी झाली? अज्ञात आरोपींनी 'ट्रम्प हॉटेल रेंटल' नावाचे एक बनावट ॲप तयार केले आणि त्यात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. काहींना तर १०० टक्क्यांहून अधिक नफ्याचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला १,५०० रुपये गुंतवल्यानंतर ५०० रुपये परत दिले गेले, जेणेकरून गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा. पुढे डॅशबोर्डवर बनावट आकडे दाखवत 'कमाई' वाढवून दाखवली गेली, मात्र ती केवळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनावट तयार केलेली होती. AI चा गैरवापर आणि सोशल मीडियावर जाहिरात फसवणूक करणाऱ्यांनी ट्रम्प यांचे AI तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले व्हिडिओ आणि फोटोज वापरून ट्रम्प या योजनेशी जोडले असल्याचा भ्रम निर्माण केला. सोशल मीडियावर टार्गेट जाहिरातीद्वारे नागरिकांना आकर्षित करण्यात आले. ८०० हून अधिक गुंतवणूकदार फसले हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात ८०० हून अधिक नागरिक फसले असून काहींनी तर १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. यापैकी फक्त काहीच लोकांनी तक्रार नोंदवली, बाकी बरेचसे अद्यापही शांत आहेत.
हावेरीमध्ये सर्वाधिक – १५ गुन्हे दाखल
झाले आहेत, तर इतर तक्रारी बंगळूर,
मंगळूर, तुमकूर, हुबळी,
धारवाड, बिदर, कलबुर्गी,
शिवमोग्गा आणि बळ्ळारी येथील पोलीस स्थानकांत दाखल झाल्या आहेत. 'कमाई' ही केवळ भ्रम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
आहे की, ॲपवरील कमाईचे आकडे बनावट होते. नागरिकांनी काही 'टास्क' पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यावर 'रक्कम वाढली' असे दाखवले जायचे, पण प्रत्यक्षात कोणतीही आर्थिक उलाढाल होत नव्हती. तक्रारदाराचा अनुभव एका
तक्रारदाराने सांगितले की, “मला दररोज ३० रुपये मिळायचे,
त्यामुळे मी गुंतवणुकीची रक्कम वाढवत गेलो. शेवटी १ लाख रुपये
गुंतवल्यावर पैसे काढायचे असतील तर कर भरावा लागेल, असे
सांगण्यात आले. पण पैसे परत मिळाले नाहीत.”