स्टार कलाकारांशिवायही ‘सैयारा’चा झंझावात; १३२ कोटींची कमाई करत सर्वाधिक हिट ठरलेला २०२५चा चित्रपट!

मुंबई :-
गेल्या काही दिवसांपासून ‘सैयारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या
चर्चेचा विषय ठरला आहे. कोणताही स्टार न घेता, प्रसिद्ध
दिग्दर्शक मोहित सूरीने या चित्रपटातून एक फ्रेश जोडी – अहान पांडे व अनीत पड्डा यांना
लॉंच केलं आणि प्रेक्षकांनी दोघांनाही भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाने आतापर्यंत
तब्बल १३२ कोटी रुपयांची कमाई केली असून, तो २०२५ मधील
सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत:
हिट होण्यामागची ५ प्रमुख कारणं:
1. फ्रेश जोडीचा फॉर्म्युला:
‘आशिकी 2’ प्रमाणे मोहित सूरीने पुन्हा एकदा
नव्या चेहऱ्यांची जोडी (अहान-अनीत) सादर केली – आणि हा फंडा यशस्वी ठरला.
2. माऊथपब्लिसिटीचा जबरदस्त
फायदा:
प्रमोशनवर फारसा खर्च न करता, लोकांनी
एकमेकांना चित्रपट पाहायला सांगितल्याने थिएटरमध्ये गर्दी वाढत गेली.
3. दमदार अभिनय:
अहान आणि अनीत यांनी प्रभावी अभिनय सादर करत प्रेक्षकांच्या मनात
स्वतःचं स्थान निर्माण केलं, जे अनेक स्टारकिड्स करू शकले
नव्हते.
4. जबरदस्त ट्रेलर आणि गाणी:
चित्रपटाचा ट्रेलर आकर्षक होता आणि गाणी आजच्या पिढीला भावणारी
ठरली.
5. लव्हस्टोरी फॉर्म्युलाची
यशस्विता:
अॅक्शन नसतानाही एक सशक्त प्रेमकथा असल्यामुळे चित्रपटाने सर्व
वयोगटातील प्रेक्षकांना आपलंसं केलं.
कमाईचा आलेख:
सैयारा चित्रपटाने केवळ १५ दिवसांत ₹132 कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या आठवड्यांतही या
चित्रपटाची कमाई सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.