कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादाच घेतील: सुनील तटकरे
.jpeg)
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि.21-
राज्याचे कृषीमंत्री मणिकराव कोकाटे यांचा रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांसह नागरिकांतून कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राज्यभर दौरा करत आहेत. सोमवारी सोलापूर दौर्यावर आले असता हुतात्मा स्मृती मंदिरातील संकल्प मेळावा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी माजी आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान उपस्थित होते.