सोलापुरात काँग्रेस आंदोलनादरम्यान पोलिसांचा जोरजबरदस्तीचा प्रयत्न, कार्यकर्त्यांशी झटापट

आज सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कार्यकर्त्यांशी झटापट झाली. या झटापटीत काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, अशोक निंबार्गी, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशिल बंदपट्टे हे सहभागी होते. पोलिसांच्या जोरजबरदस्तीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.