सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण: प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक; सुसाईड नोटमधील गंभीर आरोप

सातारा  : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. संपदा मुंडे (वय 28) यांनी गुरुवारी रात्री ‘हॉटेल मधूदीप’मध्ये आत्महत्या केली. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार, मृत्यू गळफासाने झाला, आणि शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण आढळले नाहीत. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून, महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख केला होता. त्यापैकी प्रशांत बनकरला पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. बनकर हा मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. सुसाईड नोटनुसार, डॉ. मुंडे यांच्यावर PSI गोपाळ बदने यांनी चार वेळा अत्याचार केला, तर प्रशांत बनकर यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. या गंभीर आरोपामुळे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. तपासात समोर आलेली माहिती अशी आहे की, डॉ. मुंडे गेल्या आठ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. बनकर यांच्या आई त्यांना जेवणाचा डबा पुरवत होती. जानेवारी २०२५ पासून बनकर आणि डॉ. मुंडे यांच्यात १५८ पेक्षा अधिक फोन कॉल्स झाल्याचे कॉल डिटेल्समध्ये नोंदले गेले आहे. सातारा पोलिस हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तपास करत असून, पुढील कारवाईसाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.