आपली ओळख अजूनही सनातनी” – जमाल सिद्दीकी यांचा सांस्कृतिक वारशावर जोर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक मोर्चाचे
राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत सनातन धर्म, इस्लाम आणि भारतीय संस्कृतीतील ऐतिहासिक
संबंधांबाबत केलेले खळबळजनक दावे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. "सर्व मुस्लीम हे प्रभू रामांचे वंशज आहेत, आणि जे
राम व कृष्णाला मानत नाहीत ते खरे मुस्लीम नाहीत," असा
थेट दावा त्यांनी केला आहे. India Today ला दिलेल्या
मुलाखतीत सिद्दीकी यांनी हिंदू धर्मातील प्रभू राम आणि कृष्ण यांना इस्लाममधील
संभाव्य पैगंबर म्हणत सनातन धर्माचा गौरव केला. "सनातन धर्म इस्लामपूर्व आहे,
आणि तोच आपल्या संस्कृतीचा पाया आहे," असे
ते म्हणाले. सिद्दीकी यांनी इस्लामी परंपरेचा संदर्भ देत म्हटले की, कुराणमध्ये २५ पैगंबरांची नावे आहेत, पण हदीसनुसार १,२४,००० पैगंबर वेगवेगळ्या काळात पृथ्वीवर पाठवले
गेले. "राम आणि कृष्ण यांनाही त्यात समाविष्ट का करू नये?" असा सवाल त्यांनी केला. “सर्व मुस्लीम प्रभू
रामांचेच वंशज” भारतातील मुस्लिमांची मुळे प्राचीन भारतीय परंपरेशी जोडलेली आहेत,
असा दावा करत सिद्दीकी म्हणाले, "आपल्या
पूजा पद्धती बदलल्या असतील, पण आपली संस्कृती अजूनही सनातनी
आहे." राजकीय आणि धार्मिक वर्तुळात चर्चा या विधानामुळे धार्मिक आणि राजकीय
वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका मुस्लिम नेत्याने हिंदू देवतांना इस्लामच्या परंपरेत
सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी त्यांचे समर्थनही केले आहे. सिद्दीकी यांची पूर्वीची वादग्रस्त
विधाने
जमाल सिद्दीकी यांची अशी वादग्रस्त
विधाने नवीन नाहीत.
- फेब्रुवारी
2023
मध्ये रायपूर येथे त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांची तुलना
जिनांशी केली होती.
- जून
2023
मध्ये सहारनपूरमध्ये त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर टीका
करत मुस्लिम समाज युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वीकारण्यास तयार असल्याचे
सांगितले.
- ऑक्टोबर
2023
मध्ये कोटा येथे त्यांनी काँग्रेसने ए. पी. जे. अब्दुल कलाम
यांना पुन्हा राष्ट्रपती बनवण्याचा प्रयत्न केला नाही, अशी
टीकाही केली होती.