दिवाळी २०२५ : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे हिंदूंना शुभेच्छा संदेश; कट्टरपंथीयांकडून टीकेची झोड

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने पाकिस्तानसह जगभरातील हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही, तर पाकिस्तानच्या कट्टर धार्मिक गटांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे. शाहबाज शरीफ यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (माजी ट्विटर) हँडलवरून एक संदेश पोस्ट करत लिहिले आहे — या दिवाळीला आपण सर्वांनी एकत्र येऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही धर्माचा किंवा पार्श्वभूमीचा असो, शांततेत राहू शकेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकेल.” त्यांनी पुढे लिहिले, या पोस्टनंतर पाकिस्तानमधील अनेक कट्टरपंथीयांनी शाहबाज शरीफ यांच्यावर टीका केली. काहींनी त्यांना “हिंदूंचा समर्थक” म्हटले, तर एका वापरकर्त्याने लिहिले, ईदलाही एवढा आनंद झाला नव्हता, जेवढी दिवाळी साजरी करत आहेत.”

राजकीय वर्तुळात या घटनेवरून “दुहेरी भूमिकेचे” उदाहरण दिले जात आहे. कारण, शरीफ हे भारत आणि हिंदूंविरोधात वारंवार कठोर वक्तव्ये करत असतात, परंतु आता त्याच हिंदू समाजाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी शुभेच्छांमध्ये पाकिस्तान आणि जगभरातील हिंदूंचा उल्लेख केला असला तरी भारताचे नाव त्यांनी घेतलेले नाही, हे विशेष लक्षवेधी ठरले आहे. या घटनेने पाकिस्तानातील हिंदू समाजाने दिलासा व्यक्त केला असला तरी कट्टर गटांच्या विरोधामुळे पुन्हा एकदा धार्मिक सहिष्णुतेचा प्रश्न पाकिस्तानात ऐरणीवर आला आहे.