तेलंगणात भीषण अपघात! ट्रक-बस धडकेत १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
तेलंगणात शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला असून, खडीने भरलेला ट्रक आणि प्रवासी बस यांची समोरासमोर धडक होऊन १९ जणांचा
जागीच मृत्यू झाला आहे.
हा अपघात विकाराबाद जिल्ह्यातील मिरजागुडा गावाजवळ, बिजापूर महामार्गावर घडला. चेवेल्ला येथील एसीबी अधिकारी बी. कृष्णन यांनी
दिलेल्या माहितीनुसार, टीजीएसआरटीसीची (TGSRTC) प्रवासी बस टंदूर येथून चेवेल्ला कडे जात होती. मात्र, मिरजागुडा येथे खडी वाहून नेणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या
अपघातात बसमधील अनेक प्रवासी ठार झाले असून, ट्रकचालकाचाही
मृत्यू झाला आहे. रांजेंद्रनगर डीसीपी योगेश गौतम यांनी सांगितले की, ट्रक पूर्णपणे खडीने भरलेला असल्याने धडकेनंतर तो बसवर उलटला. “अपघाताच्या वेळी बसमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. आम्ही बचावकार्य
सुरू केले असून, जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे,” असे ते म्हणाले.
सध्या महामार्गावरील वाहतूक दोन्ही दिशेने बंद करून वळवण्यात आली
आहे.
मुख्यमंत्र्यांची
तात्काळ प्रतिक्रिया
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घटनेवर गहिवरून
शोक व्यक्त केला आहे.
सीएम कार्यालयाच्या ट्विटनुसार, “विकाराबाद
जिल्ह्यात झालेल्या बस-ट्रक अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या
संवेदना व्यक्त करतो. अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बचाव आणि मदतकार्य
गतीने करावे.” मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना जखमींना त्वरित हैदराबाद येथील
रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, उपलब्ध
मंत्री आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले आहेत.
बचावकार्य
सुरू, जखमींवर उपचार सुरू
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी रात्रभर
बचावकार्य सुरू ठेवले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती
गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून १९ मृतदेह बाहेर
काढण्यात आले आहेत.