मराठा आरक्षण लढ्याला ऐतिहासिक यश : मनोज जरांगे पाटील आंदोलनामुळे सरकार झुकले!

मराठा आरक्षणाच्या दीर्घ लढ्याला अखेर आज ऐतिहासिक यश मिळाले. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाने सरकारला झुकवले असून, मनोज जरांगे पाटील यांनी “जिंकलो हो राजे! तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो!” असे भावनिक उद्गार काढले. “एक मराठा, लाख मराठा!”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “गणपती बाप्पा मोरया!”, अशा गगनभेदी घोषणा दिल्यानंतर संपूर्ण मैदान दणाणून गेले.
सरकारकडून मान्य झालेल्या महत्त्वाच्या मागण्या
- हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय.
- गावातील कुळातील
नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- सातारा गॅझेटवर
अभ्यास करून जलद मान्यता
दिली जाईल.
- मराठा
आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येतील.
- शहीद
आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबांना १५ कोटी रुपयांची आर्थिक मदत, तसेच राज्य परिवहन मंडळात नोकरी.
मनोज जरांगे पाटील यांचे भावनिक उद्गार
“जीआर दिला की रात्री ९ वाजता मुंबई खाली
होईल. गरीबांची ताकद किती मोठी आहे हे आज सरकारलाही कळलं!”
जरांगे यांनी सरकारला आव्हान देत सांगितले की, “जीआर घेऊन या, आम्ही तुमचं स्वागत करू!”
मराठा-कुणबी एकतेबाबत सरकारचा निर्णय
सरकारने स्पष्ट केले की, मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या
मुद्द्यावर दोन महिन्यांत शासन निर्णय घेण्यात येईल.
जरांगे यांनीही ही मुदत देत सरकारला सहकार्याची तयारी दर्शवली आहे.
समाजात उत्सवाचे वातावरण
या ऐतिहासिक विजयामुळे मराठा समाजात प्रचंड उत्साह आणि
आनंदाची लाट पसरली आहे. आंदोलन स्थळी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा होत
आहे.