छत्तीसगडमध्ये भीषण रेल्वे अपघात: प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर; ६ प्रवाशांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. एक प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात ६ पवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एक मालगाडी आणि प्रवासी ट्रेनची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखम झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले. 

 अपघाताची ठिकाणे आणि कारणे

मिळालेल्या माहितीनुसार, कोरबा पॅसेंजर ट्रेन ही लालखंड जवळ एका थांबलेल्या मालगाडीला धडकली. या धडकेमुळे अनेक डबे रुळावरून घसरले आणि काही डबे मालगाडीवर कोसळले. अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.

 बचाव कार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे बचाव पथके, आरपीएफ कर्मचारी आणि स्थानिक पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आपत्कालीन वैद्यकीय पथके जखमींवर उपचार करत आहेत. रेल्वे प्रशासनाने मदत मोहिम सुरू केली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

 सिग्नलिंग सिस्टम आणि रुळांचे नुकसान

या अपघातात ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टीमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली आहे. काही गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.

 प्रशासन सज्ज

रेल्वे मंत्रालयाने या अपघाताचा उच्चस्तरीय चौकशी आदेश दिला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवण्यात येत आहेत.