Latest
लेहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला. शांतता राखण्याचा बाँड भरल्यानंतर त्यांची सुटका होणार असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नसल्याचे वृत्त आहे.
17-10-2026ठाण्यातील कोपरी उड्डाणपुलाजवळ आनंदनगर–साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान पिलर उभारणीसाठी लावलेले लोखंडी स्ट्रक्चर धावत्या कारवर कोसळले. या दुर्घटनेत चालक आणि महिला प्रवासी किरकोळ जखमी झाले. घटनेची दखल घेत एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदाराला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे वृत्त आहे.
17-10-2026दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे बसवराज गोविंद कोळी यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
17-10-2026पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राणी खुर्द यांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात आरती करून दर्शन घेतले. युवकांना रोजगार, गुणवत्तेला न्याय आणि शिक्षण क्षेत्राचा विकास या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
17-10-2026सोलापुरातील हॉटगी रस्त्यावर हॉटेलजवळ दुचाकीने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. नव्याने तयार झालेल्या सिमेंट रस्त्यावर गतिरोधक, पांढरे पट्टे आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
17-10-2026अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने ‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, मतदानाचा अधिकार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला.
16-10-2026
