'मेलोडी मंच'ची 'लफ़्ज़ों का सफ़र' स्वरचित काव्यमैफल हाऊसफुल्ल!

सोलापूर: स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या 'मेलोडी मंच'च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उडुपी कॅफे येथे 'लफ़्ज़ों का सफ़र' या विशेष काव्य आणि गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीला सोलापूरच्या दर्दी रसिकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. या शाही मैफिलीत यश क्षीरसागर, चैतन्य शेटे, मधुरा मुसळे आणि तेजस टिकोळे या लोकप्रिय परफॉर्मर्सनी आपल्या उत्कृष्ट स्वरचित कविता, गझला आणि शेरोशायरीने उपस्थितांची मनं जिंकली. मेलोडी मंचचे संस्थापक आकाश कोठाडिया यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला राहुल गोल्ड अँड सिल्वर आणि धन मॅट्रिक्स कॅपिटल  यांनी को-स्पॉन्सर्स म्हणून मोलाची साथ दिली.