आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून पूर्व भागात साकारले ‘अर्बन स्ट्रीट पार्क’; नागरिकांना मिळाली नवी चौपाटी

सोलापूर शहराच्या पूर्व भागातील नागरिकांचे चौपाटीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून आणि तब्बल ५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले ‘अर्बन स्ट्रीट पार्क’ आता नव्या स्वरूपात नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. पूर्व भागातील नागरिकांना यापूर्वी चौपाटीचा आनंद घेण्यासाठी पार्क चौक किंवा विजापूर रोड परिसरात जावे लागत होते. मात्र आता पूर्व भागातच आधुनिक सुविधा असलेली चौपाटी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या इच्छाशक्ती आणि नियोजनातून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. या अर्बन स्ट्रीट पार्कमध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी, मनोरंजनाच्या सुविधा तसेच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पूर्व भागात चौपाटी व्हावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक नगरसेविका पूजा वाडेकर आणि नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी नागरिकांना आपल्या कुटुंबासह या अर्बन स्ट्रीट पार्कला भेट देऊन आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

या नव्या प्रकल्पामुळे पूर्व भागातील नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि सामाजिक संवादासाठी एक नवे आकर्षण उपलब्ध झाले असून परिसराच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे.