धुळे जिल्ह्यात डोंगरावर तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेंदवड परिसरात एक
धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाऱ्या डोंगर परिसरात १८ वर्षीय तरुणी आणि २३
वर्षीय तरुणाचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची
नावे पल्लवी अभिमन बहिरम, वय १८, रा. वडपाडा,
शेंदवड आणि अरुण जेजीराम चौरे, वय २३, रा. मोहगाव, शेंदवड अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी ११ ऑगस्टच्या रात्री
कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर घरात झोपली होती. मात्र, १२
ऑगस्ट रोजी सकाळी ती घरात दिसून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू
केला.दरम्यान, अरुण चौरे याने मध्यरात्री एका व्यक्तीला
संदेश पाठवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवाऱ्या
डोंगर परिसरात शोध घेतला असता दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती
मिळताच पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांना ग्रामीण रुग्णालय,
पिंपळनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी साडेचार वाजता दोघांनाही मृत घोषित केले.दोन्ही मृतदेह
शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पिंपळनेर पोलिसांनी
अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागचे नेमके कारण
काय आहे, याचा तपास सुरू आहे.