सोलापुरात २३ ऑगस्टला भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
सोलापूर शहरात रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी भव्य राज्यस्तरीय
वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डोंगरदिवे वधू-वर सूचक
केंद्राच्या वतीने हा मेळावा दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत समाज कल्याण केंद्र,
रंगभवन, सिद्धेश्वर मंदिराजवळ, कलेक्टर बंगला परिसर, सोलापूर येथे होणार आहे. डोंगरदिवे
वधू-वर सूचक केंद्राने आतापर्यंत तब्बल १५ हजार ७७१ विवाह जुळवून दिल्याचा दावा
आयोजकांनी केला आहे. हजारो कुटुंबांना विवाह जुळविण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या
संस्थेच्या या यशस्वी परंपरेचा लाभ अधिकाधिक युवक-युवती आणि पालकांनी घ्यावा,
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे. या
मेळाव्यास डॉ. बी. एन. कांबळे, बाळासाहेब सरवदे, निवृत्त D.Y.S.P. शैलेंद्र माणिकराव सरवदे, अॅडव्होकेट प्रिन्सिपल किशोर शिंगाडे, अनिल कुमार
धीमधीमे, भीमशाहीर रमेश जेटीथोर यांच्यासह विविध मान्यवरांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यस्तरीय स्वरूपाच्या या मेळाव्यात महाराष्ट्रातील
विविध जिल्ह्यांमधून इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांना सहभागी होता येणार आहे.
प्रत्यक्ष भेट, संवाद आणि विवाहासंदर्भातील माहितीची
देवाण-घेवाण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी सुव्यवस्थित
नोंदणी प्रक्रिया, स्वतंत्र कक्ष तसेच मार्गदर्शनाची सुविधा
उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
इच्छुक युवक-युवती आणि पालकांनी वेळेत उपस्थित राहून या
राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले
आहे.
संपर्क:
कांतीलाल डोंगरदिवे
📞 ९८८१९५०७५४ / ८४२११०२४५२