.

Sponsored

Latest

थांबलेल्या पिकअपला दुचाकीची जोरदार धडक; वडील आणि चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर

सांगली जिल्ह्यातील तासगाव-मनेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सागर जाधव आणि त्यांच्या चार वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. पत्नी सोनाली जाधव गंभीर जखमी असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

17-09-2026
Read more

कलाकारांना व्यासपीठ देणे हीच श्री गणेशाला खरी मानवंदना; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

सोलापूरचे आराध्य दैवत श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या ‘गंगा अवतार’ या देखाव्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीच श्री गणेशाला खरी मानवंदना असल्याचे त्यांनी सांगितले.

17-09-2026
Read more

कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; नवीन इमारतीला मुहूर्त कधी?

मोहोळ तालुक्यातील कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. दररोज १०० ते २०० रुग्ण येथे उपचारासाठी येतात. छताचा स्लॅब कोसळण्याची भीती असून प्रसूती विभाग, स्वच्छतागृह आणि पाण्याच्या सुविधेचीही दुरवस्था असल्याची तक्रार आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

17-09-2026
Read more

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीस्वाराचा ओव्हरटेक; भरधाव वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्याला दुचाकीवरून ओव्हरटेक केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी ३२ वर्षीय शुभम विजय वनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

15-09-2026
Read more

गणेशोत्सवाच्या काळात जळगावात हृदयद्रावक घटना; जवानाच्या पत्नीने पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपविले

जळगाव शहरातील तळेले कॉलनी परिसरात २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. महिलेचे पती भारतीय सैन्यदलात राजस्थान येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. शनिपेठ पोलिसांकडून तपास सुरू आहे.

15-09-2026
Read more

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्णेतील शेतकरी तरुणाने जीवन संपविले; चिठ्ठीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उल्लेख

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी गणेश साहेबराव भोसले यांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.

14-09-2026
Read more
You’ve successfully enabled notifications!
Now, stay updated with the latest news and never miss out!