"सूरज चव्हाणची नवी पोस्ट व्हायरल – रहस्यमय मुलीसोबतचा फोटो चर्चेत"

मुंबई | १८ सप्टेंबर २०२५
बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत
आला आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या ताज्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये
त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. फोटोत सूरज साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत असून, त्याच्या शेजारी एक युवती उभी आहे. मात्र तिने चेहऱ्यावर हात ठेवल्याने
तिची ओळख गुपित राहिली आहे. या पोस्टला सूरजने फक्त हार्ट इमोजी कॅप्शन दिल्याने
चर्चेला आणखी उधाण आलं आहे. सूरजने यापूर्वी अनेकदा त्याच्या प्रेमभंगाविषयी खुलेपणाने
सांगितले होते. बिग बॉस घरातही तो आपल्या नात्याचा उल्लेख ‘पिल्लू’ असं म्हणत
करायचा. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये ही नवी पोस्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात
प्रेम परतलंय का? अशी चर्चा सुरू आहे.
सिनेमाची बाजू
बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज झापूक झुपूक या मराठी सिनेमातून
प्रेक्षकांसमोर आला होता. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर
अपयशी ठरला. तरीही सूरज सोशल मीडियावर सक्रिय राहून आपल्या चाहत्यांशी सतत संपर्क
साधतो.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
- “भाऊ,
ही कोण आहे? लग्न ठरलंय का?”
- “सूरज
दादा, अखेर प्रेम परत आलं का?”
- “पिल्लू
परत आलंय बहुतेक!”