लखनौमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसरच्या पत्नीचा मृत्यू : कुटुंबीयांचा सुनियोजित हत्येचा आरोप

लखनौमधील मर्चंट नेव्ही ऑफिसर अनुरागच्या पत्नी मधूच्या
संशयास्पद मृत्यूने खळबळ उडवली आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या
मधूचा मृत्यू आत्महत्या नसून सुनियोजित खून असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी
केला आहे. |
१५ लाख रुपयांची मागणी आणि छळ
मधूच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, अनुरागने
लग्नानंतर तिला १५ लाख रुपयांची मागणी केली होती. रक्कम न दिल्यामुळे तिच्यावर
मानसिक आणि शारीरिक छळ वाढला. अनुरागला दारूचे व्यसन होते आणि तो मधूला दारू
पिण्यास भाग पाडत असे. शेवटचे ऑडिओ रेकॉर्डिंग धक्कादायक १० मार्च रोजी अनुरागने
तिला मारहाण केली आणि "तू ये नाहीतर तो मला मारून टाकेल" असे म्हणत
मधूने बहिणीला बोलावले होते. त्यावेळी केलेले ऑडिओ रेकॉर्डिंग अत्यंत धक्कादायक
असून त्यात मधू रडताना ऐकू येते. गाडीतही मारहाण, मृत्यू
अगोदरचा दिवस
मृत्यूच्या आदल्या दिवशी रविवारी, मधू आणि
अनुराग कुठेतरी बाहेर गेले होते. दारू पिऊन अनुराग गाडीत बसला होता आणि गाडी मधू
चालवत होती. एका वळणावरून गाडी वळवल्याने अनुरागने तिला टोमणे मारत गाडीतच मारहाण
केली. अचानक परत येणं आणि मृत्यू अनुरागने ३० एप्रिलला सहा महिने शिप ड्युटीवर
जातो असं सांगितलं होतं. मात्र तो २२ जुलै रोजी अचानक परतला आणि त्याच्या
परतल्यानंतर केवळ १० दिवसांत मधूचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाच्या शंकेला अधिक
बळकटी मिळाली आहे. कुटुंबाचा ठाम आरोप
"मधू आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, ती
खूप आनंदी आणि उत्साही होती," असं कुटुंबीय सांगतात.
अनुरागनेच तिला मारलं, असा त्यांचा ठाम आरोप आहे. पोलिस तपास
सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे.