मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुर विमानतळावर भेट घेणारे ते राजकीय व्यक्ती कोण, शहरात रंगली चर्चा
-resized-to-1000x666.jpeg)
महापालिका निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसतसे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे, नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत, कोण कुठल्या पक्षात जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुर दौरा होता, या दौऱ्यात शहरातील काही राजकीय व्यक्तींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, त्यामुळे शहर उत्तर मतदार संघात कार्यकर्त्या मध्ये चर्चा रंगली आहे, भेट घेतलेल्या नेत्यांची अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती, भेट घेणाऱ्यांमध्ये काही पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारीआजी माजी नगरसेवक आहेत तर काही अन्य पक्षातील पदाधिकारी आहेत, त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. या गुप्त बैठकी नंतर शहर उत्तर मधील भाजप कार्यकर्त्यामध्ये कही खुशी कही गम चा माहोल आहे, असो जर या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला तर शहर उत्तर मतदार संघातील राजकारण वेगळ्याच वळणावर जाणार आहे, त्यामुळे भेट घेणाऱ्या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला तर कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल येणारा काळच ठरवेल