सावधान! उजनी धरणातून आजपासून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
सावधान! उजनी धरणातून आजपासून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
सावधान: उजनीतून
आजच पाणी सोडणार
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरण टक्केवारीच्या सत्तरीकडे वाटचाल करीत असून धरणात 50 हजार क्युसेकचा विसर्ग येत आहे. त्यामुळे पंढरपूरजवळ पूरस्थिती टाळण्यासाठी उजनी धरण व्यवस्थापनाने आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू करणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता दहा हजार क्युसेक पाणी भीमा नदी सोडले जाणार आहे. पाण्याचा हा विसर्ग हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. हा विसर्ग 50 हजारांपेक्षा अधिकही होऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापनाने केले आहे. उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये धरण 100% भरू शकेल इतके पाणी धरणात येत आहे.
Warning: Undefined variable $AdImage in /home/dailysanchar/public_html/NewsDetails.php on line 216
You’ve successfully enabled notifications!
Now, stay updated with the latest news and never miss out!