लातूरच्या मराठा आंदोलकाचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

संचार प्रतिनिधी लातूर, दि.३०-
मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या दुसर्या दिवशी शनिवारी आंदोलनात सहभागी लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. विजयकुमार घोगरे असे या मयत मराठा आंदोलकाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. शनिवारी मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजयकुमार घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.