होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकरांचे घरात लग्नसोहळा; मुलगा सोहम बांदेकरचा अभिनेत्री पूजा बिरारीसोबत विवाह ठरला.

झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय
कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर आता सासरे
होणार आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा, अभिनेता सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली
आहे. राजश्री मराठी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोहम
बांदेकरचे लग्न अभिनेत्री पूजा बिरारी सोबत होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या
लग्नाच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. मात्र, अद्याप आदेश
बांदेकर किंवा सुचित्रा बांदेकर यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सोहम
बांदेकरने स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून अभिनय क्षेत्रात
पदार्पण केले होते. दुसरीकडे, पूजा बिरारी ही साजणा मालिकेमुळे
चर्चेत आली होती. सध्या ती येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजरीची भूमिका
साकारत आहे. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहतावर्ग असून इन्स्टाग्रामवर तिला दोन
लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पूजाला अभिनयासोबतच नृत्याचीही आवड आहे. या
विवाहामुळे बांदेकर कुटुंबात सनई-चौघड्यांचा उत्सव रंगणार असून मराठी कलाविश्वात
या लग्नाची आतुरतेने चर्चा सुरू झाली आहे.