सोलापूरात मुसळधार पावसामुळे होटगी तलाव ओसंडला; रस्त्यावर पाणी, नागरिकांना काळजीचा इशारा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. होटगी रोडवरील साईबाबा मंदिराजवळील होटगी तलाव पूर्णपणे भरून वाहू लागला असून त्याचे पाणी आता रस्त्यावर आले आहे.

या अनपेक्षित परिस्थितीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक ग्रामीण भागातील नागरिकांनी वाहनधारकांना व पादचाऱ्यांना या मार्गावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.