भारताचा दमदार विजय; फुला सरेनची अष्टपैलू कामगिरी ठरली निर्णायक
रविवार, २३ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबो
येथील पी सारा ओव्हल मैदानावर भारत व नेपाळ यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरला.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच नेपाळी फलंदाजांवर दबाव टाकला. भारताच्या अचूक
व शिस्तबद्ध माऱ्यापुढे नेपाळचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून फक्त ११४ धावा करू
शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीस काही गडी गमावले असले तरी एकूण
धावसंख्या माफक असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. भारतीय संघाने हे लक्ष्य
केवळ १२.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण करत विजेतेपद आपल्या नावावर केले.
फुला सरेन ठरली ‘सामनावीर’
भारताच्या विजयात सर्वात मोठी भूमिका फुला सरेनने बजावली.
तिने लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त २७ चेंडूत नाबाद ४४ धावा ठोकल्या
ज्यामध्ये ४ चौकारांचा समावेश होता. फलंदाजीपूर्वी तिने गोलंदाजीतही प्रभाव दाखवत ३
षटकांत २० धावा देत कसून मारा केला. तिच्या या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल
तिला ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले.