महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर भीमसागर; इंदू मिल स्मारकाचे पुढील वर्षी लोकार्पण: फडणवीसांची घोषणा
मुंबई | 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील
चैत्यभूमीवर आज लाखो अनुयायांची उपस्थिती पाहायला मिळाली. भीमसागर उसळलेल्या या
दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत
महत्त्वपूर्ण घोषणा केली.
इंदू मिल स्मारकाचे 50% काम पूर्ण – पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पण
फडणवीस म्हणाले की,
“स्मारकाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम
नियोजनाप्रमाणे पार पडले तर पुढील 6 डिसेंबरला स्मारकाचे
लोकार्पण करू.”
कसे असणार हे भव्य स्मारक?
- 100 फूट उंच पायथा
- 350 फूट उंच कांस्यमूर्ती
- एकूण 450 फूट भव्य स्मारक
- प्रवेशद्वार, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह आणि विस्तीर्ण वाहनतळाची
स्ट्रक्चरल कामे पूर्ण
- सध्या अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाची कामे
प्रगतीपथावर
- पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण
- 6,000 टन पोलाद आवश्यक, त्यापैकी 1,400 टन उपलब्ध आणि 650 टन फॅब्रिकेशन पूर्ण
- पुतळ्यावरील कांस्य धातूच्या आवरणाचे काम सुरू
स्मारकाच्या बुटांच्या पॅनेलची विशेष वैशिष्ट्ये
पुतळ्याच्या दोन्ही बूटांचे पॅनेल कास्टिंग पूर्ण झाले असून त्यावरील
लेस, शिलाई
अत्यंत नैसर्गिकपणे दिसत आहे.
हे स्मारक 11 ऑक्टोबर 2015 रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.
महापरिनिर्वाण दिन — एक दृष्टिक्षेप
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन
- 12 लाख अनुयायांच्या उपस्थितीत
शिवाजी पार्कजवळ बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार
- 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला
- त्यांच्या पुण्यतिथीला ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हटले
जाते
- देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी चैत्यभूमीवर जमा
होतात