उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला : “उपमुख्यमंत्री पद असंविधानिक, तात्काळ रद्द करा”
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी राज्य सरकारवर आज जोरदार हल्ला चढवत उपमुख्यमंत्री पदच असंविधानिक असल्याचा
मुद्दा उचलला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असतानाही विधानसभा
आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नियुक्त न केल्याबद्दल
त्यांनी सरकारला कायद्याच्या चौकटीत अडकल्याचा ठपका ठेवला.
उद्धव ठाकरे म्हणाले,
“संविधानात उपमुख्यमंत्री पदाची तरतूदच नाही. जर तुम्ही आम्हाला
कायदे दाखवणार असाल, तर हे असंविधानिक पद तात्काळ रद्द करा.
ज्यांच्या खात्यावर उपमुख्यमंत्री आहेत, त्या खात्यांचे
पूर्ण मंत्री त्यांना बनवा.”
ते पुढे म्हणाले,
“तिजोरीच्या चाव्या द्यायच्या असतील तर द्या, बाथरूमच्या चाव्या द्या, पण ‘उपमुख्यमंत्री’ हे
बिरुद लावण्याची काही गरज नाही.”
सरकारकडे थेट सवाल करताना त्यांनी विचारले की,
“दिल्लीचा पाठिंबा असूनही हे सरकार विरोधी पक्षनेतेपदाला इतके
घाबरते आहे का? लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहात
विरोधी पक्षनेतेपद घोषित करणे हे सरकारचे कायदेशीर कर्तव्य आहे.”
याशिवाय, नगरपालिकांच्या निवडणुकांवर बोलताना उद्धव ठाकरे
म्हणाले की,
“आधी बूथ कॅप्चरिंग व्हायचं, आता थेट
संपूर्ण निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदारयादीतील प्रचंड घोळ
लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही विनंती केली की,
“भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर कोर्ट स्वतःहून दखल घेते. तसंच
लोकशाहीच्या या गंभीर प्रश्नावरही लक्ष द्यावं आणि मतदारयादीतील घोळ दूर होईपर्यंत
निवडणुका स्थगित कराव्यात.”
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा
पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.