येडेनिपाणी फाटा येथे भरदिवसा गोळीबार; अर्जुन थोरात गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

कुरळप – वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाटा येथे आज (२२ नोव्हेंबर) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भर दिवसा झालेल्या गोळीबारात अर्जुन शंकर थोरात (वय 52) हे गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारात थोरात यांच्या पोटात आणि पाठीत गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूरचे पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील आणि कुरळप पोलीस ठाण्याचे निरीक्षक विक्रम पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सखोल तपास सुरू केला आहे. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर त्वरित पलायन केले असून, हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरु आहे.