माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपात प्रवेश
सोलापूर: माजी आमदार तथा
सोलापूर बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने यांनी भाजपात प्रवेश केला. गुरुवारी
मुंबईत आपल्या समर्थकांसह आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत माने
भाजपात गेले. माजी आमदार दिलीप माने यांना
भाजपात घेण्यात सुभाष देशमुख यांचा विरोध होता. त्यामुळे माने यांचा प्रवेश
लांबणीवर पडला होता. अखेर देशमुख यांचा विरोध मावळत आज भाजपात माने प्रवेश करतील
अशी शक्यता वर्तवली जात होती.