ईच्छा भगवंताची परिवाराकडून नूतन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार
सोलापूर - सोलापूर शहरातील सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरातील एका
सामान्य कुटुंबातून आलेल्या लेकीने आज थेट दिल्लीतील संसदेत झेप घेत सोलापूरचा
आवाज बुलंद केला आहे. राज्यसभेच्या खासदारपदी प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची
बिनविरोध निवड झाल्याबद्दल ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने त्यांचा अत्यंत
उत्साही वातावरणात रेल्वे लाईन येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालय येथे
सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२
चे भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी ज्योतीताई वाघमारे यांना खासदार ताई नमूद असलेले
मानाचा निळा फेटा, शाल, भारताच्या
संविधानाचे पुस्तक तसेच मोची समाजाचे आराध्य दैवत आदी जांबमुनी महाराजांची प्रतिमा
देऊन भव्य हार घालून सन्मानित केले. यावेळी त्यांचे स्वागत हलग्यांच्या कडकडाटात व
फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. संघर्षमय जीवनप्रवासातून आमच्या भगिनी ‘भीम
कन्या’ म्हणून उभ्या राहिलेल्या ज्योतीताईंची राज्यसभेवर झालेली निवड ही
सोलापूरसाठी अभिमानाची व प्रेरणादायी घटना ठरली आहे. सर्वसामान्य झोपडपट्टी
परिसरात वास्तव्य होती ही लेक आता संसदेत सोलापूरचा आवाज ठरणार आहे, असे भावनिक उद्गार व्यक्त करत किसन जाधव यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी
शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नक्कीच प्राधान्य
देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गल्लीतील मुलगी आज
दिल्लीत पोहोचली आहे सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाच्या वेदना व प्रश्नांची मला
जाणीव आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी अहोरात्र काम करणार,” अशी भावनिक ग्वाही खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी दिली तसेच ईच्छा
भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या सामाजिक कार्याचे
त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिवसेना
नेते मनीष काळजे, नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, नगरसेविका सौ.चैत्राली ताई शिवराज गायकवाड, नगरसेविका
सौ. कल्पना संतोष कदम, सौ. लक्ष्मी नडगिरी, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, कुमार जंगडेकर,
हनुमंत सायबळु, संतोष कदम, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सुधीर बहिरवाडे, अर्जुन
साळवे, सचिन जाधव, निलेश कांबळे,
सचिन गुत्तेदार, हरीश तेलगू, व्यंकटेश जाधव (दुर्गा), धनराज संधोळकर, प्रथमेश गायकवाड,तेजस गायकवाड,अजिंक्य
जाधव,करण जाधव, कार्तिक जाधव, श्रीकांत गिडे, संतोष ऋतिक गायकवाड, राम पल्ली मिस्त्री, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज
पठाण, यल्लाप्पा शिवापूरकर, हनुमंत
माडेकर, युवराज जाधव, संजय भंडगे,सोनू तळभंडारे यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने
उपस्थित होते.