सभागृहात गोंधळ, 96 = 2 नगरसेवक भिडले,

शहरातील पाणी पुरवठा आणि नव्या करप्रणालीच्या मुद्द्यावरून महानगरपालिका सभागृहात मोठा गोंधळ उडाला. नगरसेवक अमोल शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासोबत तीव्र शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत गेल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले आणि गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसचिवांना निर्देश देत नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना एका सभेसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर संबंधित नगरसेवक अधिक आक्रमक झाले. त्यांनी महापालिका आवारात आंदोलन करत भारतीय जनता पक्षाचा निषेध केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडूनही तत्काळ आंदोलन करण्यात आले आणि त्यांनीही आपला निषेध नोंदवला. या घटनेमुळे शहराच्या राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.