सोलापुरात पाणीटंचाई तीव्र; महिलांचा महापालिकेवर घागर मोर्चा

सोलापूर : शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अनियमित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ प्रभाग ११ मधील महिलांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले.

१०-१० दिवसांनी पाणी

शहरातील अनेक भागांत चार, आठ तर काही ठिकाणी तब्बल दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

महिलांचा आक्रोश

मोर्चादरम्यान “पाणी द्या, पाणी द्या, नाही तर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

भाजप नगरसेवकही आंदोलनात

या आंदोलनात भाजपचे स्थानिक नगरसेवकही सहभागी झाले होते. त्यांनीही प्रशासनावर टीका करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

मुख्य मागणी काय?

  • शहरात नियमित आणि नियोजित पाणीपुरवठा करावा
  • किमान तीन दिवसांआड पाणी देण्याची व्यवस्था करावी
  • पाणीपुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करावी