HR हेडचा गुप्त प्लॅन उघड! ‘दबंग मॅम’ का शिकवत होती बुरखा घालायला?

नाशिक : Tata Consultancy Services (TCS) च्या BPO विभागातील कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून प्रकरण अधिक गंभीर होत आहे. या प्रकरणात HR मॅनेजर निदा खान हिची भूमिका सर्वाधिक चर्चेत असून ती सध्या फरार असल्याची माहिती आहे. FIR मधील आरोपांनुसार, निदा खान केवळ प्रशासकीय भूमिकेत मर्यादित नसून महिला कर्मचाऱ्यांवर धार्मिक दबाव टाकणाऱ्या आणि छळ करणाऱ्या टीम लीडर्ससोबत सक्रिय असल्याचा आरोप आहे. ती महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडत असल्याचेही समोर आले आहे. तक्रारीनुसार, काही कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने धार्मिक कृती करण्याचा दबाव टाकण्यात आला. महिलांवर लैंगिक छळ, अश्लील वर्तन तसेच खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचेही आरोप आहेत. विरोध करणाऱ्यांना अधिक त्रास दिला जात असल्याचे पीडितांनी सांगितले आहे.

या प्रकरणात एका पुरुष कर्मचाऱ्यानेही तक्रार नोंदवली असून, कार्यालयात संघटित पद्धतीने धार्मिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली असून त्यात ७ पुरुष आणि १ महिला आरोपीचा समावेश आहे. मात्र, प्रमुख संशयित निदा खान अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात HR विभागाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. काही पीडितांना तक्रार नोंदवण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप आहे, त्यामुळे अनेक घटना उघडकीस आल्या नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर काही संघटनांनी आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तपासादरम्यान काही आंतरराष्ट्रीय संपर्कांचाही तपास सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपास सुरू असून, निदा खानच्या अटकेनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे