झाडग्राममध्ये मोदींनी घेतला ‘झालमुडी’चा आस्वाद; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

झाडग्राम : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक थांबून स्थानिक स्ट्रीट फूड ‘झालमुडी’चा आस्वाद घेतल्याची घटना चर्चेत आली आहे. रविवारी प्रचाराच्या व्यस्त दौऱ्यात मोदींचा ताफा एका छोट्या दुकानाजवळ थांबला. ते स्वतः गाडीतून उतरून स्टॉलकडे गेले आणि ‘झालमुडी’ खाल्ली. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

झालमुडी म्हणजे काय?

झालमुडी हे पश्चिम बंगालमधील अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. ‘झाल’ म्हणजे तिखट आणि ‘मुडी’ म्हणजे चुरमुरे. चुरमुरे, कांदा, मिरची, मसाले आणि विशेषतः मोहरीच्या तेलामुळे या पदार्थाला खास चव येते. हे खाद्यपदार्थ कमी वेळात तयार होतो आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. आवडीनुसार यात खोबरे, चणे किंवा अतिरिक्त मसाले घालता येतात.

सेलिब्रिटींनाही आवड

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या कार्यक्रमात कोलकात्याच्या झालमुडीचा उल्लेख केला होता.

कशी बनवतात झालमुडी?

साहित्य:

  • चुरमुरे (२ कप)
  • उकडलेले बटाटे
  • कांदा, टोमॅटो, काकडी
  • काळे चणे
  • हिरवी मिरची
  • मोहरीचे तेल
  • शेव/फरसाण
  • मसाले व लिंबाचा रस