सोलापूरातील ज्येष्ठ उद्योजक संदीप जव्हेरी यांचे निधन; नेत्रदानातून दिला मानवतेचा संदेश

सोलापूर : रेल्वे लाईन्स परिसरातील रहिवासी संदीप अरविंदभाई जव्हेरी (वय ५४) यांचे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरातील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. संदीप जव्हेरी हे ‘जव्हेरी ऍडव्हर्टायझिंग सर्विसेस’चे संचालक होते आणि सोलापूरातील जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले होते. मरणोत्तर त्यांनी नेत्रदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत. ते इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूर केंद्र, श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ, सेंट जोसेफ प्रशाला माजी विद्यार्थी संघ आणि रोटरी क्लब यांसारख्या विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय होते. तसेच सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील ‘सावा’ या संघटनेचे ते माजी अध्यक्ष व सल्लागार होते. महाराष्ट्र राज्यातील ‘फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज मार्केटिंग अंत्रप्रेनर्स’ या संघटनेचेही ते माजी उपाध्यक्ष होते.

त्यांच्या निधनामुळे सोलापूर शहराने एक सक्रिय, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे.