अशोक खरात प्रकरणात ईडीचा मोठा झटका
शिर्डी : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात, ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमधील युवा उद्योजकाच्या तारांकित हाॅटेलवर आणि निवासस्थानावर ईडीने छापा घातला. शिर्डी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा घातल्याने चांगलीच खळबळ उडाली. लॅपटाॅप, हार्डडिक्स, लाॅकरमील दस्तऐवजाची पडताळणी केली. या मुळे ईडीच्या छाप्याची जोरदार चर्चा आहे.
शिर्डीमधील हा युवा उद्योजक अशोक खरात याचा अनुयायी आहे.
खरात याला अटक होण्यापूर्वी, याच हाॅटेलवर तीन बड्या सरकारी
अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. तसंच याच हाॅटेलवर सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच्या गुप्त
आर्थिक बैठका होत होत्या. त्यामुळे
ईडीच्या या कारवाईची चर्चा आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीतील या युवा उद्योजकाच्या कोपरगावमधील निवासस्थानी
आणि शिर्डीमधील सन अॅण्ड सन रस्त्यावरील तारांकित हाॅटेलवर एकाच वेळी छापा घातला.
या वेळी ईडी अधिकाऱ्यांबरोबर शस्त्रधारी
होते. ईडी अधिकाऱ्यांनी हाॅटेलमध्ये
प्रवेश करताच, अकाऊंट रूम, मालकाची रूम
ताब्यात घेतली.
ईडीअधिकाऱ्यांनी
मालकाचा लॅपटाॅप, हार्डडिक्स, लाॅकरमधील
दस्तऐवज यांची पडताळणी केली. या छाप्यात
ईडीने हाॅटेलमधील सर्व खोल्या ताब्यात घेतल्या होत्या. सकाळी आठ ते दुपारी
तीन वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये
ईडीअधिकाऱ्यांची कारवाई सुरू होती.
अशोक खरात याचे राज्यभर अनुयायी आहे. या अनुयायांमार्फत
अनेक ठिकाणी खरात याने गुंतवणूक केली आहे. याची माहिती ईडीला प्राप्त झाली आहे. SIT देखील यात तपास करत आहे. संबंधित प्रकरणाशी निगडीत पुरावे गोळा करत आहे.
अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार काही संस्थांमार्फत सुरू
होते. त्याची देखील चौकशी होत आहे. या कारवाईवेळीच राज्य पतसंस्था फेडरेशनचे
संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भोंदू अशोक
खरात याचे समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत बनावट खाते उघडून आर्थिक व्यवहार केले
आहेत. या पार्श्वभूमीवर कोयटे यांनी दिलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला