मुंबईत सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश; महिला क्रिकेटरकडून उद्योगपतीकडून 63 लाखांची उकळणी

मुंबई : मुंबईत सेक्सटॉर्शनचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला क्रिकेटरने उद्योगपतीला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून तब्बल 63 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने Farkhanda Khan हिला तिचा भाऊ Bazil Aziz Khan आणि साथीदार Imtiyaz Wani यांच्यासह अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात राहणारा 28 वर्षीय उद्योगपती 2024 दरम्यान पश्चिम उपनगरात राहत असताना त्याची ओळख फारखांदा खान हिच्याशी झाली. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर फारखांदाने उद्योगपतीकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने नकार दिल्यानंतर तिने धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. “तुला जेलमध्ये पाठवेन” अशी धमकी देत तसेच दोघांमधील मोबाईल चॅट्स सार्वजनिक करण्याची भीती दाखवत तिने पैशांची उकळणी केली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उद्योगपतीने सुरुवातीला 23 लाख रुपये आणि त्यानंतर आणखी 40 लाख रुपये दिले. एप्रिल 2024 पासून ही उकळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपी फारखांदा खान आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली, तर त्यांचा साथीदार श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेत आहेत.