वडोदरा विमानतळावर विराट कोहलीला चाहत्यांचा गराडा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून सुरू
होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट
कोहली वडोदरा येथे दाखल झाला. मात्र, विराट
विमानतळावर उतरताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आणि काही काळ
गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर
मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी विराटला घातला गराडा
बुधवारी वडोदरा विमानतळावर काळा टी-शर्ट आणि काळा चष्मा
अशा ‘कूल’ लूकमध्ये विराट कोहली बाहेर पडताच चाहत्यांनी त्याला चारही बाजूंनी
घेरले. आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी
चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे विराटला आपल्या
गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी तो काहीसा अस्वस्थही दिसत
होता. अखेर सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत विराटला सुरक्षितपणे
कारपर्यंत पोहोचवले.
व्हिडीओ व्हायरल या घटनेचा मोबाईल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विराट कोहलीच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती येत आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम
फॉर्ममध्ये आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीला दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर
त्याने शानदार पुनरागमन करत नाबाद अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दक्षिण
आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती मालिकेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावत आपला
फॉर्म कायम राखला. विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना देखील विराटने एक शतक
आणि एक अर्धशतक ठोकले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विराटकडून
मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिल्ली संघाबाबत अपडेट न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी
विराट दिल्लीसाठी आणखी एक सामना खेळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी हे वृत्त फेटाळून लावत विराट
आता पूर्णपणे भारतीय संघासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्लीचा संघ
सध्या पाच सामन्यांत चार विजयांसह ग्रुप ‘डी’मध्ये अव्वल स्थानी आहे.