"शेती क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, संशोधन व नवोन्मेषाची गरज"
सोलापूर : श्री. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर
कॉलेज (स्वायत्त), सोलापूर व संगमेश्वर रात्र महाविद्यालय,
सोलापूर, अर्थशास्त्र विभाग तसेच सोलापूर
विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. प्रा. डॉ.
चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यानाचे करण्यात आले होते. या स्मृती व्याख्यानात
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे (अधिष्ठाता, मानवविद्या शाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,
सातारा तसेच IQAC समन्वयक व अर्थशास्त्र
विभागप्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा)
यांनी “भारतीय शेती समोरील बदलती आव्हाने” या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण
मार्गदर्शन केले. भारतीय शेतीतील संरचनात्मक बदल, हवामान
बदलाचा परिणाम, वाढती उत्पादनखर्च, शेतकऱ्यांचे
उत्पन्न, बाजारव्यवस्थेतील अस्थिरता, कृषी
धोरणे, तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत शेती यांसारख्या
मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले. शेती क्षेत्रातील आव्हानांना सामोरे
जाण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, संशोधन व नवोन्मेषाची गरज
त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. धर्मराज काडादी
होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. ऋतुराज
बुवा प्र. प्राचार्य, प्रा. डॉ. श्रीनिवास गोटे, प्राचार्य, संगमेश्वर रात्र महाविद्यालय, डॉ. सुहास पुजारी, उप प्राचार्य कला विभाग, प्रा. डॉ. संतोष कदम (अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ
अर्थशास्त्र परिषद), प्रा. डॉ. राजाराम पाटील (अध्यक्ष,
१८ वे अर्थशास्त्र वार्षिक अधिवेशन), प्रा.
डॉ. अमोल खाडे (सचिव, सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद)
व डॉ. सविता अनिलकुमार वावरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर
विद्यार्थी व अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी व उपस्थितांनी वक्त्यांशी सुसंवाद साधत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली गिरी, प्रास्ताविक डॉ.
संगीता कामत, पाहुणयांची
ओळख डॉ. अविनाश जम्मा व आभार प्रदर्शन डॉ. रेवप्पा कोळी यांनी केले.
यावेळी डॉ. संतोष मेटकरी, डॉ. प्रवीण राजगुरू, डॉ. रेश्मा शेख, प्रा. युवराज सोलापुरे यांनी
कार्यक्रम यशस्वी होण्यास परिश्रम घेतले. यावेळी डॉ. मोहरकर, डॉ. सुहास दहीटनेकर, डॉ. महानंदा बगले, प्रा. सुनीता सरवदे, डॉ. शीला रामपुरे, डॉ. अचकनल्ली, डॉ. देवसाने, प्रा. संतोष पवार, डॉ. मेटील, प्रा. बल्लाळ, प्रा.
शहाबुद्दीन शेख, श्री. रेवणसिद्ध कोरे, प्रा. प्रतीक्षा बसाटे, शिवदारे महाविद्यालयाचे डॉ.
महादेव कांबळे, डॉ. अनिता बिराजदार, वालचंद
महाविद्यालयाचे डॉ. व्होटकर, दयानंद महाविद्यालयाचे डॉ. सरोज
साखरे अशा वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून विविध प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित
होते.
सदर स्मृती
व्याख्यान शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त
केली. भारतीय शेतीसमोरील आव्हानांवर शैक्षणिक पातळीवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे
नमूद केले.