ऑपरेशन टायगर यशस्वी! उद्धवसेनेच्या सहा खासदारांचा वेगळा गट स्थापन; लोकसभा अध्यक्षांची मान्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू
झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांमध्ये नाराजी
असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत राजकीय
वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. या चर्चांना अधिक बळ मिळाले ते शिवसेना (शिंदे गट)
नेते व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे. नाराज
खासदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यास शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचे
सरनाईक यांनी म्हटले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या नवनिर्वाचित
खासदारांच्या बैठकीला नऊपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने
चर्चांना उधाण आले. काही खासदारांनी वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थिती दर्शवली होती.
बैठकीनंतर खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीत
भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग आला. यामुळे ठाकरे
गटातील संभाव्य बंडखोरीच्या चर्चांना खतपाणी मिळाले.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व प्रमुख प्रवक्ते संजय राऊत
दिल्लीला रवाना झाले. लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची
चर्चा असली तरी राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी
बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र
आहेत. बैठकीला अनुपस्थित असलेले खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि दूरध्वनीद्वारे
चर्चेत सहभागी झाले होते. माध्यमांमध्ये चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा
आरोपही त्यांनी केला.
भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्ष फोडण्याचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे.
मात्र शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून अनेक संकटांनंतरही पक्ष मजबूत
राहिल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, खासदार अनिल देसाई यांनीही ठाकरे गटातील बंडाच्या
चर्चांना पूर्णविराम देत सर्व खासदार पक्षासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.