आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सोलापुरात वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांच्या निकाली निर्णयासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या
सन्मानपूर्वक भविष्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने दिनांक १६ जून २०२६
पासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.
१. सेवा प्रवेश नियम तातडीने जाहीर करण्यात यावेत.
२. मंजूर आकृतीबंधाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
३. ५६ कर्मचाऱ्यांची मागे घेतलेली पदोन्नती पूर्ववत
करण्यात यावी.
४. प्रशासकीय पदावरील प्रलंबित बढत्या तातडीने देण्यात
याव्यात.
५. बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी.
६. १०-२०-३० कालबद्ध सेवांतर्गत लाभ लागू करण्यात यावेत.
७. कर्मचाऱ्यांच्या पदांचे नामकरण सुधारित करण्यात यावे.
बंधू-भगिनींनो,
या मागण्या केवळ कागदावरील मुद्दे नाहीत. या मागण्यांशी
आपल्या कुटुंबाचे भविष्य, मुलांचे शिक्षण, आर्थिक
सुरक्षितता, सेवासन्मान आणि कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान जोडलेला
आहे.त्यामुळे या विविध मागण्यांसाठी संघटना बेमुदत संप पुकारला आहे.