मनपाच्या इतिहासातील विक्रमी १८० हून अधिक ठराव मंजूर; आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्यालांचा सत्कार

सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील विक्रमी १८० हून अधिक ठराव एकाच सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार केला. सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर तब्बल १८० हून अधिक विषय होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देत, वेळेचे प्रभावी नियोजन करत सर्व विषयांवर मंजुरी दिली. नगरसेवकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत त्यांनी सभा यशस्वीरीत्या पार पाडली.

महापौरांच्या कार्यशैलीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. सभेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, अक्षय अंजिखाने, शाहूजी सलगर मंडल अध्यक्ष नागेश सरगम, दीपक राजगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.